मराठी संगीत ऎका

Google
 

छातीत निर्भय श्वास दे

छातीत निर्भय श्वास दे,
साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्‍या संकटांना
ठेचणारे पाय दे ।|

ध्येय दे उत्तुंग मंगल
अढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू दे
हृदयातून गंगेपरी ।।

दीनदुबळ्या रक्षणा रे,
शस्त्र दे माझ्या करी ।
दु:शासनाच्या दानवी
रुधिरांत धरती न्हाऊ दे।।

निष्पाप जे ते रुप तुझे
उमजूं दे माझे मला ।
धर्म, जाती, पन्थ याच्या
तोड आता श्रुंखला ।।

नवीन गगने, नवीन दिनकर,
नवीन चंद्राच्या कला,
या नव्या विश्वात तुझ्या
न्याय नीती नांदू दे ।।
मूळ कवी:

2 comments:

Anonymous said...

what is the 'mool kavi'?
who is the original poet?

Anonymous said...

छान!अप्रतीम कलेक्शन!
ब्लॉगचं डिझाईन छान केलं आहेस!
जाहिराती कशाला हव्यात?

संपर्क करा