मराठीत लिहिण्यासाठी फोनेटिक टायपिंग या पद्धतीचा वापर करणे फार सोपे आहे. "फोनेटिक टायपिंग" म्हणजे इंग्रजीमध्ये उच्चार केल्याप्रमाणे इंग्रजी रोमन लिपीतून मराठी लिहिणे. योग्य सॉफ्टवेअर वापरता त्या इंग्रजीतून लिहिलेल्या मराठीचे देवनागरी मराठीत रूपांतर करता येते.
खालील माहिती फक्त "Windows" प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम)शी संबंधित आहे. लिनक्स प्रणाली बद्दल माहिती http://indlinux.org/ येथे उपलब्ध आहे.
बराहा -यासाठी विनामूल्य वापरासाठी "बरहा" हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून प्रस्थापित करावे त्यानंतर संगणकाच्या कळपटलावर (keyboard वर) मुद्रित केलेली इंग्रजी अक्षरांची माहिती "बराहा " हे सॉफ्टवेअर थेट मराठीमध्ये परिवर्तित करते. उदाहराणार्थ इंग्रजी कळपटलावर लिहिलेले "m" "a" "r" "a" "a" "T" "h" "I" हे थेट "मराठी" असे देवनागरी युनिकोड मध्ये लिहिल्या जाते. ह्याच पद्धतीचा वापर करून ब्राऊजर मधील लेख लिहिण्याकरिता असलेल्या "फॉर्म (Form)" मध्ये थेट मराठीत लिहिता येईल. "बराहा" सॉफ्टवेअरसोबतच इंग्रजी कळपटलाचा (keyboard) उपयोग करून मराठीत लिहिण्याकरिता मदत करण्यास "सहाय्यपत्रिका (Help Document)" पण मिळते. ती वाचून कुठलेही अक्षर, जोडाक्षर, काना, मात्रा, वेलांट्या, अनुस्वार इत्यादी मराठी मुद्रण कसे करावे ह्याची माहिती मिळेल.
मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००३ लिप ही आणखी एक मराठी लिहिण्याची पद्धत आहे. मायक्रोसॉफ्टच्या भाषाइंडिया ह्या संकेतस्थळावर ह्याबद्दल माहिती उपलब्ध आहे.
मराठी लिहिण्याबद्दल आणखी एक लेख येथे उपलब्ध आहे: http://gparab.diinoweb.com/files/Online%20Fol/Font%20Problem.pdf आशा आहे की या माहितीचा बऱ्याच वाचकांना उपयोग होईल. आपल्या मराठीत लिहिण्याच्या उपक्रमाला शुभेच्छा!
मराठी लेखन सॉफ्टवेअर डाऊनलोड करा
मराठी संगीत ऎका
मराठीत कसे लिहावे?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment